Ad will apear here
Next
अंजनीच्या सुता, तुला रामाचं वरदान
पंढरपूर : रोपळे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथे मंगळवारी, ११ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव व नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळी महाप्रसाद म्हणून गावजेवणाचे आयोजन करण्यात आले होते. गेली अनेक वर्षे रोपळे ग्रामस्थ एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. अशा प्रकारे साजरा होणारा गावातील हा एकमेव उत्सव आहे.

रोपळे येथील ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भजन, कीर्तन, हरिपाठ व ज्ञानेश्वरी पारायण आदी धार्मिक कार्यक्रमांचा समावेश होता. मंगळवारी भल्या पहाटेपासूनच हनुमान जन्मोत्सव सोहळ्यासाठी मंदिरात जाण्याची लगबग घराघरात दिसत होती. कार्यक्रम मंदिरात असला तरी प्रत्येकाच्या दारात सडासंमार्जन करून आकर्षक रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यामुळे गावात उत्साह व आनंदाचे वातावरण होते. 

सूर्योदयाच्या समयी श्रींच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करताच मोठी आतषबाजी करण्यात आली. हनुमान जन्माचे आख्यान घेऊन विश्वंभर महाराज कदम यांनी सुश्राव्य कीर्तन केले. या वेळी श्रींचे बारसेही करण्यात आले. यासाठी मंदिरात आकर्षक फुलांनी सजवलेला पाळणा बांधण्यात आला होता. या कार्यक्रमाला महिला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पारंपरिक पद्धतीने पाळणा गाऊन नामकरण विधी पार पडला. 

ज्वारीच्या घुगऱ्या, सुंठवडा, डिंकवडा आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांच्या मोठ्या पंगतींचे नियोजन करण्यात आले होते. गव्हाची खीर आणि भात-सांबार यांचा महाप्रसादात समावेश होता. बुधवारी (१२ एप्रिल) भारुडाच्या कार्यक्रमाने या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता झाली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZQCBB
Similar Posts
साडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस पंढरपूर : सावळ्या विठूरायाच्या पंढरीत विठूरायाच्या भक्तीने वेडी झालेली अनेक माणसे येत असतात. असाच एक वेडा माणूस पंढरपुरात आहे; पण त्याचे वेड जरा वेगळे आहे. ते वेड आहे लोकांना पुस्तके भेट देण्याचे. आजपर्यंत विविध प्रसंगांच्या निमित्ताने या माणसाने जवळपास साडेतीन ते चार हजार पुस्तके लोकांना भेट दिली आहेत
गांधी विचार परीक्षेचा निकाल जाहीर सोलापूर : जळगाव येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे घेतलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेचा जिल्हास्तरीय निकाल जाहीर झाला असून, यात रोपळे (ता. पंढरपूर) येथील पाटील विद्यालयातील दहावीची विद्यार्थिनी चैताली धोंडीराम भोसले हिने या परिक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला
‘आमचा योगदिन दररोजच’ सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील रोपळे (ता. पंढरपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडून योगासने दररोज करून घेतली जात आहेत. त्यामुळे त्या शाळेसाठी रोजचा दिवसच योगदिन असतो. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन सर्वत्र साजरा केला जात असताना, योगासने दररोज केली जावीत, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र
वैष्णवीने मिळवले धवल यश पंढरपूर : सोलापूर जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या प्रज्ञा शोध परीक्षेत रोपळे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील वैष्णवी सिद्धेश्वर लेंगरे हिने यादीत चौथा क्रमांक पटकावला आहे. तिने २००पैकी १९२ गुण मिळवले. एका छोट्याशा गावातील या मुलीने मिळवलेल्या या धवल यशाबद्दल तिचे आणि शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language